Explore

Search
Close this search box.

Search

May 17, 2025 8:40 am

MPC news

Bhosari : आमदाराचे नक्की काम काय?, शरद पवार गटाचा सवाल

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये गेली दहा वर्ष  (Bhosari) येथील आमदारांनी केलेली कामे पाहिली तर प्रत्येक सुजाण नागरिकाला प्रश्न पडतो की आमदाराचे नक्की काम काय? गेल्या दहा वर्षात आमदारांनी कामाच्या नवीन प्रथाच सुरू केल्या आहेत. अजमेरा कॉलनीमध्ये आमदारांनी नुकतेच एका सोसायटी बाहेर पत्रे बसविण्याचे काम केले. त्यामुळे आमदाराचे नक्की काम काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे.

नेहरूनगर येथील साई मंदिरामध्ये स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला माजी महापौर हनुमंत भोसले, स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले, माजी नगरसेवक पंकज भालेकर, समीर मासुळकर,विनायक रणसूभे, तसेच नजीर तरासगर, संजय उबाळे, संजय उदावंत, युवराज पवार, डॉ. नितीन लोंढे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य निवृत्ती शिंदे, नंदकुमार शिंदे, सचिन गायकवाड, जयंत शिंदे, रशीद पिरजादे, मदनशेठ चौधरी, सोन्या बापू तरटे आदि उपस्थित होते.

येणारा काळ वैऱ्याचा असून आपल्याला सावध राहायचे आहे. तुम्हाला मटन खायला घालतील. देवदर्शन करून आणतील पण आपल्या मनात जे आहे तेच करायचे. नेहरूनगर हे एक कुटुंब आहे. या कुटुंबाने एकदा ठरवले एखाद्याच्या मागे ठामपणे उभे रहायचे तर हे कुटुंब मागे हटत नाही. हे मी गेल्या 40 वर्षाच्या अनुभवावर सांगत असल्याचे माजी महापौर हनुमंत भोसले म्हणाले. भोसरी मतदारसंघातील नेहरूनगर या भागातून भरघोस मतांनी नागरिक अजित गव्हाणे यांना निवडून आणतील. नेहरूनगरमधून मिळालेले लीड तुमच्या कायम आठवणीत राहील. 1978 पासून समाजकारणात (Bhosari) काम करत आहे. गेली 40 वर्षाहून अधिक काळ राजकीय क्षेत्रात काम केले आहे. नुकतेच ऐकले की, भोसरी विधानसभेतील कोणाचे 200 कोटीचे हॉटेल परदेशात आहे.

Alandi : इंद्रायणी नदीत उडी मारण्यापूर्वी महिला पोलिसाने केला मित्राला फोन; कारण अजूनही गुलदस्त्यात

हे ऐकूनच धडकी भरते. लोकांनी दिलेल्या वर्गणीवर मी एकेकाळी निवडणूक लढवलेली आहे. जेव्हा असे कोट्यावधींचे आकडे ऐकतो तेव्हा नवल वाटते. अनेक जण मला विचारतात, तुम्ही दोन नंबरने पैसा का कमवला नाही? तेव्हा मी सांगतो “मी दोन नंबरने पैसा कमावला असता तर माझी मुले आज एक नंबरला राहिली नसती. त्यामुळे पैशाच्या मागे न लागता समाजासाठी, समाजाचे ऐकत काम करावे लागते. हेच संस्कार मी अजित गव्हाणे यांच्यामध्ये पाहत आहे. त्यांचे वडील नगरसेवक होते. शिवाय एका बँकेचे उच्चपदस्थ अधिकारी देखील होते. त्यामुळे सुशिक्षितपणा, संस्कार त्यांच्या रक्तात आहेत.

आताची निवडणूक वेगळी आहे असे सांगत हनुमंत भोसले यांनी नागरिकांना जागृत राहण्याचे आवाहन केले.कोणी काही म्हणू दे, जागृत राहून सावधगिरीने आपले काम करायचे “हक्काचे सोडून पळत्याच्या मागे लागायचे नाही. आपला स्वाभिमान जपणारा, आपली कामे करणारा आणि आपल्या भागाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या उमेदवाराला आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहे. आता अजित गव्हाणे यांच्या रूपाने आपल्याला असा उच्चशिक्षित, सुसंस्कृत कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला, आपली कामे करणारा आणि आपल्या भागाला शांततामय वातावरण देणारा उमेदवार लाभला आहे. त्याच्यासाठी जीव (Bhosari) ओतून काम करायचे आहे. आपल्या भागातून भरघोस मतांनी त्यांना पुढे न्यायचे आहे. आपण दिलेले लीड पुढच्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांच्या लक्षात राहील असे काम आपल्याला करायचे आहे असे आवाहन भोसले यांनी नागरिकांना केले.

राहुल भोसले म्हणाले, नेहरूनगर मधील नागरिक आखाड पार्टी, देवदर्शनाच्या ट्रीप अशा कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत. अनेक वर्ष त्यांनी एकनिष्ठ राहत आपली जबाबदारी काय हे दाखवून दिले आहे. त्यामुळे नेहरूनगरमध्ये प्रचारासाठी वेळ खर्च करू नका

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर