एमपीसी न्यूज – तळवडे मध्ये तीन मेडिकल दुकाने (Talawade) फोडल्याची घटना रविवारी (दि. 25) सकाळी सहा वाजता उघडकीस आली. तीन दुकानांमधून चोरट्यांनी 41 हजार 400 रुपयांची रोकड चोरून नेली आहे.
ऋषिकेश काकासाहेब निंबाळकर (वय 25, रा. तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune : स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार विदुषी देवकी पंडित यांना जाहीर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशनगर-रुपीनगर रोडवर रुपीनगर येथे फिर्यादी निंबाळकर यांचे सई मेडिकल दुकान आहे. शनिवारी रात्री त्यांनी दुकान बंद केले. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी निंबाळकर यांच्या सई मेडिकल दुकानाचे शटर उचकटून 40 हजार रुपये रोख रक्कम चोरली.
त्यानंतर बाजूला असलेल्या श्री मेडिकलचे शटर उचकटून 600 रुपये रोख रक्कम (Talawade) चोरली. तसेच समर्थ मेडिकलचे शटर उचकटून 800 रुपयांची रोख रक्कम चोरली. तीन दुकानांमधून चोरट्यांनी 41 हजार 400 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.