Explore

Search
Close this search box.

Search

November 14, 2024 12:10 am

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Pune : शिवाजीनगर येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – कौशल्य विकास, (Pune)रोजगार व उद्योजकता विभाग पुणे आणि आकांक्षा फाऊंडेशन स्किल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 31) प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉर्डन महाविद्यालय शिवाजीनगर येथे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी नऊ वाजता आयोजित या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध 100 नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून त्यांच्याकडून 9 हजारापेक्षा अधिक रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. ही रिक्तपदे किमान 10 वी, 12 वी, पदवीधर, कोणत्याही शाखेचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम (आयटीआय) पूर्ण केलेला, पदविकाधारक, शिकाऊ अभियंता (ट्रेनी इंजिनिअर) अशा विविध पात्रताधारक उमेदवारांतून भरण्यात येणार असून नोकरीइच्छुक उमेदवारांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

Pune : पुण्यातील 80 बालकलाकारांनी अयोध्येत सादर केले गीतरामायण 

देखील सहभाग नोंदवावा. स्वयंरोजगाराबाबत माहिती व मार्गदर्शनाकरीता शासनाची विविध कर्ज देणारी महामंडळे, सारथी, बार्टी, अमृत, जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनासंबधीत दालने तसेच सीईओपीचे भाऊ इन्स्ट्यिूट, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, द ॲटोमोटिव्ह रिसर्च असोशिएसन ऑफ इंडिया (एआरएआय), स्मार्ट, मॅग्नेट प्रकल्प, नांदी व देअसरा फांऊडेशन, डॉ. रेड्डीज फाऊंडेशन, जन शिक्षण संस्था, लाईट हाऊस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फाऊंडेशन, एनएसडीसी इंटरनॅशनल अशा शासकीय, खासगी व सेवाभावी संस्थांचे स्टॉलही असणार आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहितीसाठी विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावेत. रोजगार मेळाव्याच्या दिवशी थेट मुलाखतीस येताना आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज, बँक पासबुक, आधारकार्डाच्या आदींच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.

जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉर्डन महाविद्यालय, शिवाजीनगर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ येथील कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर