आजचे पंचांग (Today’s Horoscope 27 August 2024)
आजचा दिवस – मंगळवार.
तारीख – 27.08.2024
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष- गोपाळकाला.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- रोहिणी 15.38 पर्यंत नंतर मृग.
चंद्र राशी- वृषभ.
—————————–
मेष- (शुभ रंग- डाळिंबी)
आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्ण अनुकूल आहे पैशाअभावी रखडलेली कामे पुन्हा हाती घेता येतील. आज कार्यक्षेत्रात तुमचे वक्तृत्व गुण कमी येतील. छान दिवस.
वृषभ (शुभ रंग- पिस्ता)
कुठेही आज आपलीच मर्जी चालवाल. कार्यक्षेत्रात आज तुमच्यातील नेतृत्वगुणांना चांगला वाव मिळेल. आज महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपल्या मुद्द्यावर ठाम राहाल.
मिथुन (शुभ रंग – क्रीम)
आज खर्च प्रमाणाबाहेर वाढणार आहे. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. आज जेष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये.
कर्क ( शुभ रंग- हिरवा)
कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वीच्या श्रमांचे फळ मिळेल. व्यावसायिक येणी आकस्मिक पणे वसूल झाल्याने नव्या व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. आज दिवस लाभाचा.
सिंह ( शुभ रंग- गुलाबी)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे समाधान होणे कठीण आहे. ध्येयपूर्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागणार आहेत आज फक्त कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.
कन्या (शुभ रंग- राखाडी)
एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आज दिवस तितकासा अनुकूल नाही. प्रामाणिक प्रयत्नांना मात्र दैव साथ देईल. मित्र आज चुकीचा मार्ग दाखवतील.
तूळ (शुभ रंग- आकाशी)
नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न डोकावता फक्त आपल्या कामाला प्राधान्य द्या. आज झटपट लाभाचा मोह टाळा. घरात जोडीदाराच्या कलानेच घ्या.
वृश्चिक ( शुभ रंग- चंदेरी) Today’s Horoscope 27 August 2024
दैनंदिन जीवनात आज काही मनासारख्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. उद्योग व्यवसायात मात्र स्पर्धा अटळ आहे. आज वैवाहिक जीवन सौख्यपूर्ण असेल.
धनु (शुभ रंग- सोनेरी )
नोकरी धंद्याच्या ठिकाणी हितशत्रू तुमच्या चुका शोधत असतील त्यांना आयटी संधी देऊ नका. नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम काटेकोरपणे पाळायला हवेत.
मकर (शुभ रंग- भगवा)
आज तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड उत्साह असेल. खर्च वाढला असला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. गृहिणींनी आज झाकली मूठ झाकलीच ठेवणे हिताचे.
कुंभ ( शुभ रंग- जांभळा)
वास्तु व वाहन खरेदीच्या कर्ज मंजुरीसाठी केलेले प्रस्ताव मान्य होतील. घरातील सदस्यांमध्ये आज सामंजस्याची भावना राहील. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता राहील.
मीन (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज बरीच भटकंती होईल. शेजाऱ्यांशी काही क्षुल्लक कारणाने मतभेद होण्याची शक्यता आहे. मोफत सल्लागारांना लवकर फुटवा.
शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424
Talegaon Dabhade : विन्यासा योग वर्गामध्ये योगिनींनी सादर केला बहारदार श्रावणी खेळांचा कार्यक्रम