एमपीसी न्यूज – मोलमजुरी करून कमावलेले (Khed) पैसे गावी देण्यासाठी जाणाऱ्या दोघांना धमकावून लुबाडण्यात आल्याची घटना शनिवारी (दि.24) निघोजे खेड येथे घडले आहे.
या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी संघपाल दिलीप रोडे (वय 34 रा. नीघोजे ,खेड) याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार श्रीराम विकास हनवटे (वय 36 रा.निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी महाळुंगे पोलीस ठाण्यात लक्ष्मणदास नागोदास (वय 21 रा निघोजे) यांनी फिर्याद दिली आहे.
Pimpri : खरेदी केलेल्या साहित्याचे पैसे मागितले म्हणून ज्येष्ठ महिलेवर तलवारीने वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र मुन्ना दास हे दोघे मजुरीतून जमा केलेली रक्कम गावी देण्यासाठी जात होते. यावेळी आरोपी हे लाल रंगाच्या दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादी यांच्या खिशातील चाळीस हजार रुपये व त्यांच्या मित्राच्या खिशातील दहा हजार रुपये असे 50 हजार रुपये बळजबरीने काढून घेतले.
याला विरोध केला असता आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून (Khed) दहशत निर्माण केली व तेथून पसार झाले. यावेळी फिर्यादी यांनी आरोपीच्या दुचाकीचा क्रमांक लक्षात ठेवून पोलीस तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी एकाला अटक केली असून महाळुंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.