Explore

Search
Close this search box.

Search

November 6, 2024 12:56 am

MPC news

Pimpri : शाडू मातीच्या मूर्ती वापरास प्राधान्य द्या, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवाच्या काळात(Pimpri) शहरातील मूर्ती तयार करणारे कारागीर, मूर्तिकार तसेच उत्पादकांनी केवळ शाडू मातीच्या मुर्तींची निर्मिती किंवा विक्री करावी. नागरिकांनीही केवळ पर्यावरणपूरक शाडू मातीच्या नैसर्गिक रंग वापरून तयार केलेल्या आणि पाण्यात सहज विरघळणाऱ्या मुर्त्या तसेच पर्यावरणपूरक सजावटीचे पूजा साहित्य वापरून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

महानगरपालिका आणि शहरातील नागरिकांनी नेहमीच पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यास प्राध्यान्य दिले आहे. आपले पिंपरी-चिंचवड पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित राहील याची दक्षता घेण्याची जबाबदारी ही शहरातील प्रत्येक नागरिकाची आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा. तसेच मूर्ती तयार करणारे सर्व कारागीर, मूर्तिकार तसेच उत्पादक यांनी केवळ पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणाऱ्या मातीच्या मूर्तींची निर्मिती करावी. तसेच नागरिकांनी आपली व आपल्या शहराच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही आयुक्त सिंह यांनी केले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीओपी मूर्ती उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रातील मूर्ती बनवणारे कारागीर, मूर्तिकार व उत्पादक यांना पीओपी पासून मूर्ती बनविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच महापालिका कार्यक्षेत्रात केवळ पर्यावरणपूरक मूर्तीचे उत्पादन व विक्री करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महापालिकेच्या उद्योगधंदा व परवाना विभागाशी संपर्क साधून गणेशमुर्ती स्टॉलबाबत परवानगी घेऊन परवानगीची 1 प्रत पर्यावरणपूरक मूर्ती विक्रीचे दुकान किंवा स्टॉलच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक असणार आहे, असे पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी कळविले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचना –

भारत सरकाच्या केंद्रीय पर्यावरण वने वातावरणीय बदल विभागाच्या वतीने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 12 मे 2020 रोजी मूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केलेली आहेत. त्यास अनुसरुन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) उपकर अधिनियम 1974 तसेच उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात गणेशोत्सव 2024 बाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

· महानगरपालिका क्षेत्रात श्री गणेशाची मूर्ती या नैसर्गिक, पर्यावरणपूरक जैव विघटक पदार्थांपासून तयार करण्यात येतील, ज्या प्लास्टीक, थर्माकॉल, पीओपी, स्टेपलर, प्लास्टिक मणी पासून मुक्त असतील, अशा मूर्तीना प्रोत्साहन दिले जाईल, मात्र पीओपी पासेन तयार करण्यात आलेल्या मूर्तीना बंदी असेल.

· सर्व मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात, रहिवासी संकुलातील टाकीमध्ये करणे अथवा महापालिकेच्या मूर्ती स्विकृती केंद्रामध्ये देणे बंधनकारक आहे.

· मूर्तीकारांना मूर्ती घडविण्यासाठी, विक्रीसाठी तसेच साठवणूकदारांसाठी मंडप उभारण्यासाठी प्रभाग कार्यालयामार्फत परवानगी घेणे बंधनकारक राहील. सदर परवानगीची प्रत त्यांनी मंडपात दर्शनी भागात प्रसिद्ध करायची आहे.

Pune Airport : पुणे विमानतळावरील जुन्या टर्मिनलचे होणार आधुनिकीकरण

· पर्यावरणपूरक साहित्य, शाडू मातीने मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना या वर्षी प्रायोगिक तत्वावर उपलब्धतेनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर शाडू माती करिता मागणी केल्यास निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात येईल. मात्र ते स्वतः मूर्तीकार असणे बंधनकारक आहे. मूर्तीकारांनी त्याचे वहन करुन त्यांच्या ठिकाणी घेवून जायची आहे. तसे हमीपत्र सही करुन आपल्या मंडपाच्या ठिकाणी किंवा दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.

· पर्यावरणपूरक साहित्य, शाडू मातीने मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांनी त्यांच्या मंडपाबाहेर पर्यावरणपूरक साहित्याने घडविलेल्या मूर्ती उपलब्ध आहेत अशा आशयाचा 3 x 5 फूट एवढ्या आकारमानाचा फलक लावणे बंधनकारक आहे.

·महानगरपालिकेने परवानगी दिलेल्या मूर्तीकार, साठवणूकदार, विक्रीकर व हमीपत्र भरुन दिलेल्यांकडूनच प्राधान्याने पूजा व उत्सव मंडळाने मूर्ती प्राप्त करुन घ्यावी, असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

· पर्यावरणपूरक साहित्य, शाडू मातीने मूर्ती घडविण्याचे, साठविण्याचे वेळोवेळी देण्यात आलेले निर्देश सन 2024 च्या नवरात्रोत्सवादरम्यान देखील लागू राहतील व त्यासाठी स्वतंत्र निर्देश, परिपत्रक, जाहिरात देण्यात येणार नाही.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर