एमपीसी न्यूज – दहीहंडीकडे केवळ उत्सव म्हणून (Pune) न पाहता त्याद्वारे जनजागृती करण्याचा शुक्रवार पेठेतील व्हाईट हाऊस मित्र मंडळाचा पायंडा आहे. हीच परंपरा पुढे नेत यंदा देखील स्त्रींया व बाल लैंगिक अत्याचाराचा देखावा करत व्हाईट हाऊस मित्र मंडळाच्या दहीहंडीने सर्वांचे लक्ष वेधले.
बदलापूर व कलकत्ता येथील स्त्री लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर भारतात बालके व महिलांवरील लैंगिक अत्याचार थांबावेत यासाठी आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली, अशी माहिती मंडळातील सौरभ मते यांनी दिली. यावेळी बारामती येथील गोविंदा पथकाने चार थर उभारत ही दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी ढोल ताशा पथकाचे वादन करत पारंपारीक पद्धतीले हंडी फोडण्यात आली.
Wakad : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक
गेल्यावर्षी मंडळाने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिवे (Pune) लावून श्रद्धांजली अर्पण केली होती. यंदा याच प्रेरणेतून लैंगिक अत्याचार विरोधात ही दहीहंडी साजरी करण्यात आली.
या संकल्पनेसाठी मंडळातील सौरभ मते,परेश जाधव,पवन ढेरे,हर्षद पायगुडे,वैष्णव जगताप,अथर्व जावळकर,प्रशांत पायगुडे,यश मोरे,शिवराज वासुंडे,त्रुतुराज गाडे,ओंकर थोपटे, जय मोरे,निरंजन थोपटे,जय मोरे,मंथन जाधव या कार्यकर्त्यांनी श्रम घेतले.