एमपीसी न्यूज : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे (Suhasini Deshpande) निधन झाले. त्यांनी मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मराठीसोबतच त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले होते. 2011 मध्ये आलेला रोहित शेट्टीचा ‘सिंघम’ हा त्यांचा शेवटचा हिंदी चित्रपट ठरला.
सुहासिनी देशपांडे यांची अभिनय कारकीर्द 70 वर्षांहून अधिक आहे. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी 100 हून अधिक (Suhasini Deshpande) चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांमध्ये मनाचं कुंकू (1981), कथा (1983), आज झाले मुक्त मी (1986), आई शपथ (2006), चिरंजीव (2016), 2017 चा ‘धोंडी’ आणि 2019 चा चित्रपट ‘बाकाल’ यांचा समावेश आहे.
आज पुणे येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टिमध्ये शोककळा पसरली आहे.