एमपीसी न्यूज – काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील कोंढवा भागातून बनावट टेलीफोन एक्सचेंज सुरू असल्याचे उघडकीस आले होते. दहशतवाद विरोधी ( Kondhwa) पथकाने याप्रकरणी छापेमारी करत मोठी कारवाई केली होती. या प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली असून तीन जणांना अटक केली आहे. नौशाद अहमद सिद्दिकी उर्फ कुमार (32), मोहम्मद ऊजेर शौकत अली अन्सारी उर्फ सोनू (वय 29) आणि पियुष सुभाषराव गजभिये ( वय 29) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. आरोपींनी चालवलेले टेलिफोन एक्सचेंज बेकायदेशीर असून, आंतराष्ट्रीय कॉल करून आरोपींनी शासनाची फसवणूक केली तसेच आर्थिक लाभ घेतल्याचे म्हंटले आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने पथकाने बनावट टेलिफोन एक्सचेंजवर टाकलेल्या छाप्यात जवळपास 3788 सिम का(र्ड , 8 राउटर मिळाले आहेत. त्यांनी हे साहित्य ( Kondhwa) कुठून कसे आणले? त्यांचे इतर साथीदार कोण आहेत, आंतरराष्ट्रीय कनेक्शन कसे मिळाले? यात काही दहशतवादाचा अँगल आहे का याचा तपास करायचा आहे. त्यामुळे सरकारी वकीलांनी तिघांना पोलीस कोठड़ी देण्याची मागणी केली. त्यानुसार विशेष न्यायाधीश एस.के दुगावकर यांनी आरोपींना दि. 6 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठड़ी सुनावली.
Pune : पुण्यात पुन्हा गॅंगवॉर; खुनी हल्ल्यातून बचावलेल्या तरुणावर पुन्हा एकदा खुनी हल्ला
कोंढव्यातील मिठा नगर येथे असलेल्या एम.ए.कॉम्प्लेक्स परिसरात विदेशातून भारतात येणारे आंतरराष्ट्रीय कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू केले होते. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले. तर सरकारी वकील बोधिनी शशीकर यांनी युक्तिवाद केला की आरोपी नौशाद हां कोंढव्यात भाड्याच्या घरात राहत होता. हे तिघे एकमेकांचे मित्र आहेत. तिघे पूर्वी भिवंडीत राहत होते. नौशाद आणि सोनू हे आठवी पास तर पियूषने संगणक डिप्लोमा केला ( Kondhwa) आहे.
https://support.google.com/youtube/answer/2802167?hl=en