एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 05 Sepetember 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग
आजचा दिवस – गुरुवार
तारीख – 05.09.2024.
शुभाशुभ विचार- शुभ दिवस.
आज विशेष- साधारण दिवस
राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र- उत्तरा फाल्गुनी 06.14 पर्यंत नंतर हस्त.
चंद्र राशी – कन्या.
मेष (शुभ रंग- मरून)
ध्येय प्राप्तीसाठी तुमचे अथक परिश्रम चालू असून तब्येतीकडे मात्र तुमचे दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीची गरज भासेल. विद्यार्थ्यांना आज स्पर्धेत यश मिळेल.
वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. आज सहकुटुंब एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल.
मिथुन (शुभ रंग – गुलाबी)
आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस, कुठेही न जाता घरी आराम करावासा वाटेल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावर घेतील. मुलांच्या शिस्तीला प्राधान्य द्यायला हवे.
कर्क ( शुभ रंग- राखाडी)
प्रॉपर्टी विषयी मोठे आर्थिक व्यवहार टाळा. आज प्रवासात काही नवीन नाती जुळून येतील. काही अति हुशार मंडळी ही संपर्कात येणार आहेत डोके शांत ठेवायला हवे.
सिंह ( शुभ रंग- पांढरा)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. मृदू वाणीने विरोधकांनाही आपलेसे करता येईल. आज नेत्यांची वक्तव्य जनमानसांवर प्रभाव टाकतील. आशादायी दिवस.
कन्या (शुभ रंग- हिरवा)
आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. काही क्षुल्लक गोष्टीवरून तुम्हाला राग येईल. आज महत्त्वाच्या चर्चेत आपलेच घोडे पुढे दमटवाल.
तूळ (शुभ रंग- मोरपंखी)
बेरोजगारांना घरापासून लांब नोकरीसाठी संधी येतील. अधिकारी वर्गाला कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. दुकानदारांनी आज उधारी उसनवारी टाळावी.
वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)
आज आनंदी व उत्साही असा दिवस असून काही दुरावलेली नाती जवळ येतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळेल. तुमची काही अपुरी स्वप्न साकार होतील.
धनु (शुभ रंग- चंदेरी)
आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. मित्रमंडळींना आज दोन हात लांबच ठेवा.
मकर (शुभ रंग- मोतिया)
नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम मोडू नका. आज वरिष्ठांना खुश करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. मनशांतीसाठी सत्संगाकडे पाय वळवावे लागतील.
कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)
आज आपल्या मर्यादित राहिलेले बरे. धाडसाची कामे आज टाळलेली बरी. सासुरवाडी कडून एखादा लाभ संभवतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घ्या.
मीन (शुभ रंग- क्रीम)
भागीदारीच्या व्यवसायात देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. वैवाहिक जीवनात जुन्या आठवणी मनाला आनंद देतील. दूरच्या प्रवासात काही वेळ खोळंबा संभवतो.