एमपीसी न्यूज – राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी श्रीवर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ चिंचवडगाव ( Chinchwad ) येथे सदिच्छा भेट दिली. संघातील साध्वींचे दर्शन घेऊन तटकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
चिंचवड येथे चातुर्मास निमित्त उप प्रवर्तिनी, महासाध्वी डॉ. प. पु. प्रियदर्शनाजी महाराज साहेब व इतर साध्वी वृंदाचे आशीर्वाद घेऊन जैन समाजास पर्युषणपर्वानिमित्त शुभेच्छा दिल्या. अदिती तटकरे यांनी यावेळी धार्मिक विषयांवर चर्चा केली.
जैन समाजातील अडचणींविषयी निवेदन देण्यात आले. यावेळी प्रकाश भंडारी व सुजित चोपडा तसेच जैन स्थानक श्रावक संघ चिंचवड ( Chinchwad ) सभासद होते.