एमपीसी न्यूज – पत्नीला गर्भस्त्राव होण्याच्या गोळ्या खायला दिल्याने अतिरिक्त स्त्राव होऊन तिचा मृत्यू ( Mahalunge) झाला. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार सन 2021 ते 5 सप्टेंबर 2024 या कालावधीत खेड तालुक्यातील मोई गावात घडला.
शिवराज मन्नाप्पा राठोड (वय 31, रा. कर्नाटक) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन धर्मानायक चव्हाण (वय 21, रा. कर्नाटक) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Maval : पर्यावरण जपणे हे आपले कर्तव्य – रो किरण ओसवाल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण (वय 27) आणि आरोपी शिवराज यांचा विवाह झाला होता. ते दांपत्य खेड तालुक्यातील मोई येथे वास्तव्यास होते. दरम्यान शिवराज याचे गावाकडील महिले सोबत प्रेमसंबंध असल्याने तो फिर्यादी यांच्या बहिणीला त्रास देत असे. कोणत्या ना कोणत्या कारणावरून शिवीगाळ करून उपाशी ठेवून माहेरहून खर्चासाठी पैसे व सोने घेऊन येण्याचा तगादा लावला. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. ती दोन महिन्यांची गरोदर असताना तिचा गर्भपात करण्याच्या उद्देशाने तिला गर्भस्त्राव होण्याच्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यामुळे अतिरक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास ( Mahalunge) करीत आहेत.