एमपीसी न्यूज – मध्यरात्री कामावरून घरी जात असलेला व्यक्ती रस्ता ओलांडत असताना त्याला भरधाव ( Moshi) कारने धडक दिली. या अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 4) मध्यरात्री दीड वाजता भारत माता चौक, मोशी येथे घडला.
अर्जुन पुरन विश्वकर्मा (वय 32, रा. मोशी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दीपक पूर्ण विश्वकर्मा (वय 23) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार कार चालक विकास सबरलान पूर्ण नाव पत्ता माहिती नाही याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pimpri : गणेशोत्सवाच्या काळात शहरातील जलतरण तलाव राहणार बंद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक यांचा भाऊ अर्जुन हा पुणे नाशिक महामार्गावरील मोशीतील भारतमाता चौक येथे रस्ता ओलांडत हेाता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एचआर 22 क्यू 4785 या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अर्जुन यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत ( Moshi) आहेत.