एमपीसी न्यूज : आळंदी येथील फ्रुटवाले (Alandi) धर्मशाळेत हभप गुरुवर्य मारूती महाराज कुऱ्हेकर बाबा यांचा 93 वा व रामायणाचार्य हभप रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांचा 70 अभिष्टचिंतन व गौरव दिन सोहळा पार पडणार आहे.
या निमित्त कुऱ्हेकर बाबा यांना शांतीब्रम्ह व ढोक महाराज यांना तुलसीदास पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे आयोजन हभप रामरावजी महाराज ढोक महाराज व सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी 7 ते 9 या वेळेत भव्य दिव्य मिरवणूक सोहळा सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था चाकण रोड ते फ्रुटवाले धर्मशाळे पर्यंत पार पडणार आहे.
Alandi : चाकण चौक येथील तुळशी वृंदावन जवळचे काही विद्युत दिवे गायब
सकाळी 9 ते 11 हभप संदीपान महाराज शिंदे यांचे हरीकिर्तन संपन्न होणार आहे. या निमित्त वारकरी संप्रदायातील मान्यवरांसह इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.