एमपीसी न्यूज : आळंदी येथील चाकण चौकात (Alandi) पालिकेची सुंदर अशी कलाकृती तुळशी वृंदावन आकर्षणाचे स्थान बनले आहे. अनेक नागरिक येथे मोठ्या प्रमाणात छायाचित्रण करताना दिसतात. संध्याकाळी विविध रंगांच्या विद्युत रोषणाईमुळे तेथील भाग आणखी सुंदर आकर्षक दिसतो. परंतु, तुळशी वृंदावनाच्या बाहेरील बाजूचे विद्युत दिवे समाजकंटकांनी गायब /चोरी केल्याचे दिसून येत आहे.
पालिका वेळोवेळी दिवे दुरूस्ती करत आहे. परंतु, तेथील विद्युत दिवे वारंवार चोरी होताना दिसून येत आहे. तुळशी वृंदावनच्या बाहेरील बाजूचे जवळपास 4 ते 5 विद्युत दिवे गायब झाले आहेत.
Pimpri : बाप्पा मोरयाचा जयघोषाने दुमदुमले पिंपरी-चिंचवड शहर
पालिकेमार्फत त्याठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था केल्यास ते समाजकंटक कॅमेरामध्ये कैद होतील. याबाबत माहिती तेथील स्थानिक नागरिकाने दिली.