एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडी, चिंचवड मधील जाधव घाटावरून (Chinchwad)एका व्यक्तीने शुक्रवारी (दि. 6) दुपारी पवना नदीत उडी मारली. व्यक्तीच्या शोधासाठी अग्निशमन विभाग, वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांचे जवान दिवसभर राबले. मात्र व्यक्तीचा शोध लागला नाही. रात्र झाल्याने पथकांनी शोधमोहीम थांबवली असता गर्द झाडीत लपून बसलेला व्यक्ती स्वतःहून पाण्यातून बाहेर पडला.
आबासाहेब केशव पवार (वय 45) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
Pimpri : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी 15 ठिकाणी मूर्ती विघटन केंद्राची स्थापना
याबाबत माहिती अशी की, पोलीस अंमलदार संजय आंधळे यांनी शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास अग्निशमन विभागाला माहिती दिली. जाधव घाटावरून एका व्यक्तीने नदीत उडी मारली आहे आणि तो जिवंत आहे. त्यानुसार प्राधिकरण उपकेंद्राचे एक पथक, पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्रातून एक जलपरी, एक झेनॉन वाहनासह अग्निशामक अधिकारी गौतम इंगवले, प्रमुख अग्निशामक विमोचक संपत गौंड, संजय महाडिक, यंत्रचालक रुपेश जाधव, मयूर कुंभार, वाहनचालक प्रदीप हिले, फायरमन संभाजी अवतारे, अनिल माने, वाहन चालक राजेश साखळे, सतीश साबळे, ट्रेनि फायरमन तेजस पवार, सुमित फरांदे, शिवाजी पवार, राकेश महामुलकर, सुशील चव्हाण, साहिल देवगडकर, रुपेश मेश्राम, प्रणय सकुंडे, वैभव सोनवणे, अजय साळुंखे, स्वप्निल उचाळे, प्रतीक अहिरेकर, राज शेडगे, संकेत भोसले, रतन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
उडी मारणाऱ्या व्यक्तीचा मुलगा अर्जुन पवार यांनी सांगितले की, नदीपत्रामध्ये माझ्या वडिलांनी उडी मारली आहे आणि ते नदीपत्रात असलेल्या झाडांमध्ये लपून बसले आहेत. त्यानुसार दोन बोट व अग्निशामक कर्मचाऱ्यासह आपत्ती व्यवस्थापन पुणे, कर्मचारी व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे यांनी नदीपत्रात जाऊन शोध कार्य केले. अग्निशमक विभागाला झाडाच्या फांद्यावर त्या व्यक्तीचे शर्ट मिळाले. परंतु सायंकाळपर्यंत व्यक्तीचा शोध लागला नाही. अंधार झाल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी शोध कार्य बंद करण्यात आले.
शोध कार्य संपवून सगळे निघून गेल्यानंतर सदर व्यक्ती स्वतःहून नदीपात्रातून सुखरूप बाहेर आले. त्यांना पुढील उपचारासाठी पिंपरी मधील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी हे पाऊल का उचलले याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
youtube.com/watch?v=IOYZxQkal4M