एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेला (Mahalunge) ट्रकने पाठीमागून धडक दिली यामध्ये महिलेचा मृत्यू झाला हा अपघात शुक्रवारी दिनांक 6 सायंकाळी साडेसहा वाजता सुमारास खेड तालुक्यातील महाळुंगे गावात घडला.
उषा नितीन गाडे (वय 43, रा. येलवाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पांडुरंग कस्तुर गाडे (वय 38, रा. येलवाडी, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक हिमांशू प्रल्हाद गुप्ता (वय 25, रा. खालुंब्रे, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Moshi : मोशी येथे दारूभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुप्ता याने त्याच्या ताब्यातील ट्रक हयगयीने, अविचाराने, रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवला. इंडोरन्स चौक बाजूकडून एचपी चौक बाजूकडे जात असताना पाई चालत जात असलेल्या उषा गाडे यांना ट्रकने पाठीमागून धडक दिली. यामध्ये गाडे यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.