Explore

Search
Close this search box.

Search

November 13, 2024 7:22 am

MPC news

Bhosari : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जिवे मारण्याची धमकी; आरोपी ताब्यात 

एमपीसी न्यूज – भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना एका व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली. त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ( Bhosari ) ताब्यात घेतले आहे. 

 

उदयकुमार राय (रा. भोसरी. मूळ रा. छत्तीसगड) असे ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे.

Talegaon : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी उदयकुमार राय नावाच्या व्यक्तीने पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. आमदार महेश लांडगे यांची सुपारी मला मिळाली असल्याचे त्याने नियंत्रण कक्षात फोन करून सांगितले. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी तत्काळ तांत्रिक विश्लेषण करून फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचा ठावठिकाणा शोधला आणि त्याला ताब्यात घेतले.

 

याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. उदयकुमार हा मागील पाच वर्षांपासून भोसरी परिसरात राहत आहे. त्याने अशा प्रकारचा फोन का केला, याबाबत पोलीस ( Bhosari ) तपास करीत आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर