Explore

Search
Close this search box.

Search

December 4, 2024 11:35 am

MPC news

Chikhali : शेअर मार्केटच्या बहाण्याने 48 लाखांची फसवणूक 

एमपीसी न्यूज – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा बहाणा करत तसेच नुकसान झाल्यास भरपाई ( Chikhali ) देण्याचे आश्वासन देऊन एका व्यक्तीची 48 लाख 61 हजार 400 रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सहा जून ते सहा सप्टेंबर या कालावधीत कृष्णानगर, चिंचवड येथे घडला.

याप्रकरणी 37 वर्षीय व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टीआरपीएफ ॲपवरील मोबाईल क्रमांक 8420897081 धारक अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dighi : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरी मार्केट या शेअर मार्केटच्या व्हाट्सअप ग्रुप वर फिर्यादी ट्रेडिंग करत असताना त्यांना जास्त लाभांश देण्याचे तसेच नुकसान होत असेल तरीही त्याची भरपाई देऊ असा बहाणा आरोपींनी व्यक्त केला. त्यानंतर फिर्यादी यांना टीआरपीएफ टोकन ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले त्यांना एका व्हाटस अप ग्रुप मध्ये जॉईन करून घेत तिथे त्यांना पैसे भरण्यास सांगितले. टीआरपीएफ टोकन ट्रेडिंग या ॲपवर यूएस डॉलर द्वारे जास्त नफा झाल्याचे भासवून त्यांना आणखी वारंवार वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगून त्यांच्याकडून 48 लाख 61 हजार 400 रुपये रक्कम घेतली. त्यानंतर त्यांना कोणताही नफा अथवा गुंतवलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत ( Chikhali ) आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर