Explore

Search
Close this search box.

Search

March 27, 2025 2:37 am

MPC news

Pune : गणेशोत्सवात या 27 ठिकाणी करण्यात आली आहे वाहने लावण्याची व्यवस्था

एमपीसी न्यूज –  गणेशोत्सवात मध्यभागात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी 27  ठिकाणी वाहने लावण्याची ( Pune) व्यवस्था वाहतूक पोलिसांकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शहराच्या मध्यभागात मानाच्या गणपतींचे दर्शन, तसेच देखावे पाहण्यासाठी पुणे शहर, तसेच जिल्ह्यातून भाविकांची गर्दी होते. उत्सवाच्या काळात परगावाहून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांना मोटारी, तसेच दुचाकी लावण्यासाठी 27  ठिकाणी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.

 Pune : किरकोळ वादातून तरुणावर कात्रीने वार

मोटारी आणि दुचाकी वाहनांसाठीची पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे 

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग (दुचाकी), शिवाजी आखाडा, मंगळवार पेठ, (दुचाकी ,चारचाकी), एच. व्ही. देसाई महाविद्यालय, (पोलीस पार्किंग), हमालवाडा, नारायण पेठ, (दुचाकी, चारचाकी), गोगटे प्रशाला, नारायण पेठ, (दुचाकी), एसएसपीएमएस, शिवाजीनगर, (दुचाकी, चारचाकी), स. प. महाविद्यालय, (दुचाकी, चारचाकी), पीएमपीएल मैदान, पूरम चौक, सारसबाग, (चारचाकी), पेशवे पार्क, सारसबाग, (दुचाकी), हरजीवन हाॅस्पिटल, सारसबाग, (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ चौक, (दुचाकी), पर्वती ते दांडेकर पूल, (दुचाकी), दांडेकर पूल ते गणेश मळा, (दुचाकी), गणेश मळा ते राजाराम पूल, (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह, (दुचाकी, चारचाकी), विमलाबाई गरवारे प्रशाला, डेक्कन जिमखाना, (दुचाकी), आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रस्ता, (दुचाकी, चारचाकी), संजीवन रुग्णालय मैदान, कर्वे रस्ता, (दुचाकी, चारचाकी) आपटे प्रशाला, (दुचाकी), फर्ग्युसन महाविद्यालय, (दुचाकी, चारचाकी), जैन हाॅस्टेल, बीएमसीसी रस्ता, (दुचाकी, चारचाकी), मराठवाडा महाविद्यालय, (दुचाकी), पेशवे पथ, (दुचाकी), रानडे पथ, (दुचाकी, चारचाकी), काँग्रेस भवन रस्ता, शिवाजीनगर, (दुचाकी), न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता, (दुचाकी, चारचाकी), नदीपात्र, भिडे पूल ते गाडगीळ पूल ( Pune)  (दुचाकी, चारचाकी)

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर