एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचने एका तरुणाला अटक (Talegaon) केली. ही कारवाई शनिवारी (दि. 7) मध्यरात्री गहुंजे येथे करण्यात आली.
लखन उर्फ निखिल बाळू आळगे (वय 25, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश मालुसरे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune : अशोक बालगुडे यांना पीएच.डी. प्रदान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे येथे क्रिकेट स्टेडियमकडे जाणाऱ्या मार्गावर एकजण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाचला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून लखन आळगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 40 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास (Talegaon) करीत आहेत.