एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 08 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग
आजचा दिवस – रविवार.
तारीख – 08.09.2024.
शुभाशुभ विचार- 15 प. चांगला दिवस.
आज विशेष- ऋषिपंचमी.
राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र-स्वाती 15.31पर्यंत नंतर विशाखा.
चंद्र राशी – तूळ.
मेष (शुभ रंग- गुलाबी)
व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आज तुमच्याच प्रभावाखाली राहील. घरात जोडीदाराच्या मताने घ्या.
वृषभ (शुभ रंग- क्रीम)
नोकरदारां साठी अनुकूल दिवस असून वरिष्ठ आज तुमच्या मागण्यांचा सहानभूती पूर्वक विचार करतील. तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.
मिथुन (शुभ रंग – पिस्ता)
तरुण वर्गाचा आज मौज मजा करण्याकडे कल असेल. स्वतःची हौस भागवण्यासाठी खर्च कराल. गृहिणी आज स्वतःसाठी वेळ काढतील. प्रकृती धडधकट राहील.
कर्क ( शुभ रंग- आकाशी)
नोकरदारांना ऑफिसला दांडी मारायचा मूड असेल. गृहिणी घर स्वच्छतेचे मनावर घेतील. मुलांची अभ्यासात चांगली प्रगती दिसून येईल. कर्ज प्रस्ताव मंजूर होतील.
सिंह ( शुभ रंग- राखाडी)
ऑफिसच्या कामानिमित्त प्रवास घडतील. साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल. गायक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात असतील. गृहिणी शेजार धर्म पाळतील.
कन्या (शुभ रंग- जांभळा)
व्यवसायात आज आवक मनासारखी असेल. नोकरीच्या ठिकाणी एखादी वाढीव जबाबदारी स्वीकारावी लागेल. कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा चांगला प्रभाव पडेल.
तूळ (शुभ रंग- सोनेरी)
आज कुठेही आपलीच मर्जी चालावी असा तुमचा हट्ट असेल. आपला मोठेपणा सांभाळण्यासाठी खर्चही कराल. फारच तडे सडेतोड बोलून कोणाच्या भावना मात्र दुखावू नका.
वृश्चिक ( शुभ रंग- मोरपंखी)
काहीजणांना तातडीने दूरच्या प्रवासाला निघावे लागेल. वायफळ खर्चाचे प्रमाण आज वाढेल. प्रवासात आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक आहे.
धनु (शुभ रंग- भगवा)
व्यावसायिक उलाढाल वाढेल. नवविवाहित मंडळींची स्वप्ने साकार होतील. जिवलग मित्र व आप्तस्वकीयात तुमच्या शब्दाला मान राहील. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा आहे.
मकर (शुभ रंग- निळा)
आपल्या कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. अधिकारी वर्गाला अधिकार वापरावेच लागतील. आज मित्रांच्या फार नादी न लागता आपल्या ध्येयाकडे लक्ष द्या.
कुंभ ( शुभ रंग- पांढरा)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने काहीसा प्रतिकूल दिवस असून नोकरीतही वरिष्ठांची मर्जी सांभाळणे अवघड होईल. नास्तिक मंडळी ही आज देवाला एखादा नवस बोलून बघतील.
मीन (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आरोग्य विषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. आज धाडसाची कामे टाळावीत. झटपट लाभाचा मोह तर नकोच. विवाह विषयक बोलणी उद्यावर ढकला.