एमपीसी न्यूज – आळंदी येथील शनी मंदिराजवळील हार, फुले व इतर साहित्य वस्तूंची दुकाने आहेत. तेथील (Alandi ) सर्व दुकाने बंद असताना त्यापैकी एका दुकानातून वस्तू चोरीला जात असल्याची घटना घडली आहे.ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून एका व्हाट्स ग्रुपवर तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Pune : केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिवादन
इंद्रायणी नदी घाटावरून पाच सहा मुले शनी मंदिरा जवळील दुकानाजवळून जाताना दिसून येतात. काही मुले पुढे जाताना दिसून येतात.एक मोठा मुलगा आजूबाजूला कोण नाही याची खात्री करत एका दुकातून वस्तू चोरी करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच तो तेथील वस्तू घेत असताना एक लहान मुलगा तिथे असल्याचे दिसून येत होते.ती वस्तू दुकानातुन घेतल्या नंतर तो मोठा मुलगा व लहान मुलगा तेथून बरोबर निघून जातात.अशी घटना त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्या परिसरातील दुकाने बंद असल्याने चोरीची सवय लागली असावी तसेच त्या भागातून सतत ती चोरी करणारी मुले जात असावीत अशी शंका काहींनी उपस्थित केल्या असून त्या घटने बाबत चर्चा (Alandi ) रंगल्या आहेत.