एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या (Talegaon)रिक्त असलेल्या मुख्याधिकारी पदावर विजयकुमार सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाचे नगर विकास विभागाचे आवर सचिव अ का लक्कस यांनी याबाबत सोमवारी (दि. 9) आदेश दिले आहेत.
तत्कालीन मुख्याधिकारी एन के पाटील यांनी मद्यप्राशन करून तळेगाव दाभाडे शहरात दोन वाहनांना धडक दिली. त्यानंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामध्ये एन के पाटील यांनी मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणामध्ये पाटील यांचे निलंबन झाले होते. दरम्यान तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला.
Alandi: आळंदी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता
दरम्यान यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. विजयकुमार सरनाईक यांनी यापूर्वी देखील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून सुमारे वर्षभर काम पाहिले आहे. त्यांची बदली झाल्यानंतर एन के पाटील यांची वर्णी लागली होती. आता पुन्हा सरनाईक हे मुख्याधिकारी बनले आहेत.