एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 09 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग
आजचा दिवस – सोमवार.
तारीख – 09.09.2024.
शुभाशुभ विचार- वैधृती वर्ज्य दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र- विशाखा 18.04 पर्यंत नंतर अनुराधा.
चंद्र राशी – तूळ 19.29 पर्यंत नंतर वृश्चिक.
मेष (शुभ रंग- राखाडी)
आज जे काही कराल ते तब्येतीला जपून करा. आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या स्वीकारूच नका. गोडबोल्या मंडळींपासून लांबच राहा. आज जोडीदार जे सांगेल तेच योग्य असेल.
वृषभ (शुभ रंग- पिस्ता)
उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेला समर्थपणे तोंड द्याल. अडचणीत जोडीदाराची खंबीर साथ राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यात यशस्वी मध्यस्थी कराल.
मिथुन (शुभ रंग – आकाशी)
नोकरदारांवर कामाचा वाढता ताण राहील. ध्येय साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज जोडीदार जे म्हणेल त्याला हो म्हणणे हिताचे राहील.
कर्क ( शुभ रंग- जांभळा)
सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय उत्तम चालतील. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळी उत्कृष्ट कामगिरी करतील. उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. प्रकृती उत्तम राहील.
सिंह ( शुभ रंग- पांढरा)
आज गृह सौख्याचा दिवस असून कौटुंबिक सदस्यात खेळीमळीचे वातावरण राहील. अत्यंत सकारात्मकतेने आजच्या दिवसाची सुरुवात कराल. आज गरजूंना मदत कराल.
कन्या (शुभ रंग- सोनेरी)
कार्यक्षेत्रात आज विरोधकांशी ही गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्यावा लागेल. आज बेरोजगारांना नोकरीचे कोर्स येतील. आलेली कुठलीही संधी आज सोडू नका.
तूळ (शुभ रंग- मोरपंखी)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न करावा लागेल.
वृश्चिक ( शुभ रंग- चंदेरी)
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. उद्योग व्यवसायात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. जोडीदाराला अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल.
धनु (शुभ रंग- डाळिंबी)
आज काटकसरी वृत्तीला थोडा लगाम घालून काही अत्यावश्यक खर्च करावीच लागतील. घरात थोरांच्या होला हो करून वाद आवरते घ्या. प्रवासात तब्येत सांभाळा.
मकर (शुभ रंग- भगवा)
एखाद्या नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नोकरदारांच्या रास्त मागण्या वरिष्ठ मान्य करतील. वास्तु वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होईल.
कुंभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
तुमच्या कार्यक्षेत्रातील अति व्यस्ततेमुळे आज तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. नोकरदारांना वरिष्ठांच्या मागे पुढे करावेच लागेल. अति व्यस्त दिवस.
मीन (शुभ रंग- निळा)
तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ नक्की लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. ज्येष्ठ मंडळी सत्संगात रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत रहा.