एमपीसी न्यूज – जेलमधून सुटलेल्या भावाला भेटण्यासाठी (Hinjawadi) चाललेल्या एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री आठ वाजताच्या सुमारास हिंजवडी फेज तीन, गवारवाडी येथे घडली.
विशाल प्रकाश देवकर (वय 30, रा. घोटावडे, ता. मुळशी जि.पुणे) असे कोयत्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव असून त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय साधु कापसे (वय 29), मनोहर साधु कापसे (वय 35), साधु कापसे (सर्व रा. हिंजवडी), अमोल सुदाम धुमाळ आणि निलेश सुदाम धुमाळ (रा. धुमाळवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chinchwad : अटक करण्याची धमकी देत एक कोटी रुपयांची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी विशाल (Hinjawadi) देवकर हे आपल्या जेलमधून सुटलेल्या भावाला भेटण्यासाठी दुचाकीवरून चालले होते.
हिंजवडीतील बापुजीबुवा मंदिराजवळ त्यांना आरोपींनी अडवून पकडून ठेवले. आरोपी साधु कापसे याने फिर्यादी यांच्या थोबाडीत मारली. घाबरलेले फिर्यादी पळून जाऊ लागले असता त्यांना पाठीमागून डोक्यात कोयता मारला.
तरीदेखील फिर्यादी पळून जात असताना त्यांना फटाक्यासारखा आवाज ऐकू आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.