Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 7:32 pm

MPC news

Maval : झाडे जगवणाऱ्या हातांचा गौरव

एमपीसी न्यूज – पावसाळ्यात झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेणाऱ्या हातांचा गौरव करण्यात आला. नवसंकल्प फाउंडेशन कडून हा उपक्रम (Maval) राबविण्यात आला. ज्या व्यक्ती आणि संस्थांनी वृक्षारोपण करण्यासाठी मदत केली त्यांचा नुकताच सत्कात केला.

यावेळी बॉश कंपनीचे चाकणचे प्लांट मॅनेजर विनोद व्यंकटेश, श्रीकांत गायकवाड, ओमकार पवार नियतक्षेत्र वन अधिकारी बेबडओहळ योगेश कोकाटे, नव संकल्प फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Pune : साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदीरच्या देखाव्यात 18 संतांच्या पादुकांचे दर्शन

घोरेडेश्वर डोंगरावर नवसंकल्प फाउंडेशन तर्फे जून, जुलै, ऑगस्ट  महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. सदर वृक्षरोपण वड, पिंपळ, कडूलिंब, आंबा, चिंच, फणस, जांभूळ, आर्जुन इतर जंगली देशी वनस्पती व औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण संस्थेतर्फे करण्यात आले.

वृक्षारोपण करण्यास विशेष सहकार्य लाभलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ, बॉश कंपनी, गायकवाड नर्सरी, तसेच पवार नर्सरी यांचे राहिले. या सर्वांचा सत्कार (Maval) करण्यात आला.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर