एमपीसी न्यूज – चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना उत्तमनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी ( Pune) एकाला अटक केली.जयदीप ज्ञानेश्वर भोंडेकर (वय 22, रा. गुजर कॉम्प्लेक्स, मासे आळी, उत्तमनगर, एनडीए रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी याबाबत जयदीपची आई लक्ष्मी यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अमित सुदाम गुजर (वय 21 , रा. मासे आळी, उत्तमनगर, एनडीए रस्ता) याला अटक करण्यात आली आहे.
Today’s Horoscope 10 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
जयदीप रविवारी दुपारी घरी झोपला होता. त्यावेळी आरोपी अमित त्याच्या घरी आला. ‘दादा पोतं उचलायला जायचे आहे. माझ्यासोबत चल’, असे त्याने जयदीपला सांगितले. जयदीप घरातून बाहेर पडला. काही वेळानंतर जयदीपच्या ओरडण्याचा आवाज आला. अमितने जयदीपच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याचे उघडकीस आले. गंभीर जखमी झालेल्या जयदीपला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा सोमवारी सकाळी रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी अमितला अटक केली असून, चेष्टा मस्करीतून त्याने जयदीपचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम ( Pune) यांनी सांगितले.