एमपीसी न्यूज – दारू पिऊन गोंधळ घालत पोलिसांना मारहाण करणाऱ्या दोघांना वानवडी ( Pune) पोलिसांनी अटक केली. नयन शिवाजी भंडलकर (वय 25), आशिष शिवाजी भंडलकर (वय 22, दोघे रा. बीटी कवडे रोड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अनिकेत वाबळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune : वादातून तरुणावर कोयत्याने वार करून खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयन आणि आशिष हे दोघे दारू पिऊन बीटी कवडे रोड येथे गोंधळ घालत होते. त्यामुळे स्थानिक ( Pune) नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यातील बीट मार्शल अनिकेत वाबळे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी आले. दोघांना समजावून सांगत असताना दोघांनी पोलिसांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांना मारहाण करून त्यांचे तीन साथीदार पळून गेले.
वानवडी पोलिसांनी दोघा सख्या भावांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. वानवडी पोलीस तपास ( Pune) करीत आहेत.