एमपीसी न्यूज – शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत दांपत्याकडून 42 लाख 45 हजार रुपये घेत आर्थिक फसवणूक ( Talegaon) करण्यात आली. ही घटना 22 एप्रिल ते 28 मे या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली.
याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रोफेसर देव व्यास फर्म ज्युपिटर इंस्टीटयूट, पेग ब्रिजेस आणि ऑर्थर व्यास (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pimpri : निकृष्ट कामे; 11 ठेकेदार काळ्या यादीत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांच्या पतीला आरोपींनी एका व्हाटसअप ग्रुपला जॉईन केले. तिथे फिर्यादीस देव व्यास फर्म ज्युपिटर इंस्टीटयूट बाबत माहिती सांगितली. ही संस्था सेबी अंतर्गत नोंदणीकृत असल्याचे सांगितले. त्या माध्यमातून शेअर ट्रेडिंग करण्यासाठी फिर्यादी आणि त्यांच्या पतीकडून 42 लाख 45 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक ( Talegaon) केली.