Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 7:47 pm

MPC news

Today’s Horoscope 10 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 10 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – मंगळवार.

तारीख – 10.09.2024.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष- गौरी आवाहन.

राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.00

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र- अनुराधा20.04 पर्यंत नंतर ज्येष्ठा.

चंद्र राशी – वृश्चिक. 

—————————-

मेष (शुभ रंग- आकाशी)

आज कोणतीही रिस्क न घेता नाकासमोर चालणेच हिताचे राहील. नोकरदारांनी बिनचूक कामास प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज कोणत्याही मोहास बळी पडू नका.

वृषभ (शुभ रंग- जांभळा)

आज झालेल्या काही गाठीभेटी भविष्यात व्यावसायिक हिताच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील. आज तुमचे मनोबल उत्तम असेल.

मिथुन (शुभ रंग – राखाडी)

नोकरदारांनी नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम मोडू नयेत. विरोधक तुमच्या चुका शोधत असतील. आज तुमची तब्येतही जरा नरमच असेल. रुग्णांनी पथ्य पाणी पाळावे.

कर्क ( शुभ रंग- पिस्ता)

नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. आज तुमचा मौज मजा करण्याचा मूड असेल. सहकुटुंब चैन कराल. प्रेम प्रकरणांना थोरांचे आशीर्वाद मिळतील.

सिंह ( शुभ रंग- सोनेरी)

आज तुम्ही प्रत्यक्ष कृतीपेक्षा चर्चेतच जास्त रमाल. कुठेही न जाता आज घरीच आराम करायचा तुमचा मूड असेल. गृहिणींचे गृह उद्योग आज तेजीत चालणार आहेत.

कन्या (शुभ रंग- पांढरा)

आज घराबाहेर वावरताना डोके थंड व वाणीत गोडवा असू द्या. काही अति हुशार मंडळी संपर्कात येतील. मोफत सल्लागार मंडळींच्या होला हो करा व वादविवाद टाळा.

तूळ (शुभ रंग- चंदेरी)

व्यापार उद्योगात मिळकत मनाजोगती असेल. बंद पडलेले उपक्रम नव्याने सुरू करता येतील. आप्तसोकीय तुमच्या शब्दाला मान देतील. विरोधक आज नमते घेतील.

वृश्चिक ( शुभ रंग- मोरपंखी)

आज तुम्ही जरासे हट्टीपणाने वागाल. तुमच्याकडून काही आपलेच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. आज फक्त आपल्याच स्वार्थाचा तुम्ही विचार कराल.

धनु (शुभ रंग- भगवा) 

कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे. काही जणांना तातडीच्या प्रवासाला निघावे लागेल. केवळ भिडस्तपणा मुळे आज न परवडणारा खर्च करू नका.

मकर (शुभ रंग- डाळिंबी)

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होण्याची शक्यता आहे. जसे चिंताल तसे होईल, त्यामुळे आज फक्त शुभ चिंता.

कुंभ ( शुभ रंग- निळा)

आज तुम्ही रिकामटेकडी चर्चा टाळून फक्त कर्तव्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. अधिकारी वर्गाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल. मित्र आज चुकीचे सल्ले देतील.

मीन (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

ज्येष्ठ मंडळींना संततीकडून शुभ समाचार येतील. आज तुमचा अध्यात्माकडे कल असेल. घरात देवकार्य करण्याचे बेत आखाल. घरातील मोठ्यांचा मान राखावा लागेल.

शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 
9689165424
जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर