Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 7:30 pm

MPC news

Talegaon : लोकनृत्य स्पर्धेत नवीन समर्थ विद्यामंदिर प्रथम

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरीतील मानाचा पाचवा गणपती असलेल्या श्री गणेश तरुण मंडळ आयोजित स्व. गणपतराव (Talegaon) पंढरीनाथ शिंदे स्मृती लोकनृत्य स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत पंचक्रोशीतील शाळांनी सहभाग घेतला. स्पर्धेत नवीन समर्थ विद्यामंदिर प्रथम आले.

 

स्पर्धेचे उद्घाटन राजू शंकरराव शिंदे यांनी केले. या वर्षी 26 शाळांचा सहभाग असून जवळपास 550 विद्यार्थी सहभागी झाले होते. राजू शिंदे यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल गुप्ते, उपाध्यक्ष प्रथमेश भालेराव आणि सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धेचे आयोजन केले. सर्व स्पर्धकांनी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये स्पर्धेचे सादरीकरण केले.

 

बालवाडी गटात पैसाफंड प्राथमिक शाळा अ प्रथम, पैसाफंड प्राथमिक शाळा ब द्वितीय आणि मामासाहेब खांडगे शाळा उत्तेजनार्थ. पहिली ते चौथी गटात प्रथम क्रमांक आदर्श विद्या मंदिर, द्वितीय क्रमांक माऊंट सेंट ॲण्ड शाळा, उत्तेजनार्थ पैसाफंड शाळा. पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक नवीन समर्थ विद्यामंदिर, द्वितीय क्रमांक आदर्श विद्यामंदिर, उत्तेजनार्थ सरस्वती विद्या मंदिर.

 

विशेष तीन पारितोषिके देण्यात आली. त्यामध्ये प्रथम मामासाहेब खांडगे शाळा, द्वितीय स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, तृतीय हाय व्हिजन स्कूल तसेच माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वतीने ज्ञानयोग शाळा चाकण यांना विशेष पारितोषिक देण्यात आले.

Alandi : आळंदीमध्ये देखावे पाहण्यासाठी गर्दी

 

याप्रसंगी स्व इंदुबाई शंकरराव शिंदे आणि स्व बबनराव धर्माजी गरुड यांच्या स्मृतिप्रत्यर्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले. परीक्षक म्हणून पूर्वा भंडारे आणि तेजस्विनी गांधी कुलकर्णी यांनी काम पहिले. मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय बळवंत मेढी आणि सतीश महादेव संभूस, संगीत साधना मंडळाचे संजय गरुड उपस्थित होते.

 

यावेळी श्री गणेश तरुण मंडळाचे कार्यकर्ते राहुल सतीश संभूस यांनी हॉंगकॉंग या देशातून वरिष्ठ गटातील जागतिक क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल मंडळाच्या वतीने राहुल संभूस आणि सौ मैत्रयी राहुल संभूस यांचा सत्कार करण्यात आला. बक्षीस समारंभानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

सांस्कृतिक प्रमुख अवधूत टोंगळे यांसह यश झोडगे, रोहन मराठे, साहिल गुप्ते, ओंकार मेढी, वैष्णवी आंबिकर, मुक्ता भावसार, कल्याणी काळे, सानिका टकले, प्रणव लऊळकर, कुणाल कुलकर्णी, शिवानी कर्वे, शुभम फाकटकर, प्रशांत खेरडेकर आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम (Talegaon) घेतले.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर