Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 8:45 pm

MPC news

Charholi : चऱ्होलीतील तक्षशिला बुद्धविहार येथे बांधणार भव्य सभामंडप

एमपीसी न्यूज – समाविष्ट गाव चऱ्होली येथील(Charholi) चव्हाणनगर येथे तक्षशिला बुध्दविहार आहे. या ठिकाणी सभामंडप उभारावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांची होती. त्यानुसार, या कामाला सुरूवात करण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

तक्षशिला बुद्ध विहार, चर्होली बु ॥ (चव्हाण नगर) आणि भिमराज ग्रुप यांच्या मागणीनुसार, भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने सदर सभामंडप कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक विकास डोळस, सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर, अजित बुर्डे, प्रविणभाऊ काळजे, अतुल काळजे,भाऊ रासकर, सुनिल तापकीर, सुनिल काटे, विनोद डोळस, राहुल लांडगे, जगन्नाथ चव्हाण, अक्षय चव्हाण, प्रशांत चव्हाण, संदीप चव्हाण, सचिन चव्हाण, अभिजित चव्हाण, अर्जुन चव्हाण, बबन चव्हाण, बाजीराव चव्हाण, सुयोग चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, राजू चव्हाण, रत्नेश चव्हाण, ज्ञानदीप चव्हाण, संतोष भोसले, प्रविण गायकवाड, आकाश कांबळे, वाघेश्वर थोरे, राजेश थोरात, अशोक शिंदे, रत्नाकर तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Vanraj Andekar : वनराज आंदेकर खून प्रकरणी आणखी दोघांना अटक

तक्षशिला बुद्धविहार या ठिकाणी सभामंडप उभारण्याबाबत स्थानिक नागरिकांची सूचना केली होती. त्यानुसार सुमारे 4 हजार 500 चौरस फुटाचा सभामंडप उभारण्याचे काम सुरू केले आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील स्थानिक नागरिक, सोसायटीधारक यांच्या विविध घटकांतील नागरिकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक पाठपुरावा करीत आहोत. सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या शाश्वत विकाससाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

 

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर