Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 7:23 pm

MPC news

Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरासाठी चार पोलीस ठाण्यांना मंजुरी; वित्तमंत्री अजित पवार यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी (Chinchwad) नवीन चार पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांच्या हस्ते आळंदी आणि चाकण येथील विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

पुणे शहरात सात पोलीस ठाण्यांची आवश्यकता असल्याचे पोलीस आयुक्तांनी आपल्याला सांगितले. त्यानंतर आपण बुधवारी 11 पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली आहे. त्यामध्ये पुणे शहरासाठी सात तर पिंपरी चिंचवड शहरासाठी चार पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली असल्याचे अजित पवार म्हणाले.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण या पोलीस घटकांच्या बळकटीकरणासाठी मागील दोन-तीन वर्षांमध्ये 50 कोटींचा निधी देण्यात आला. त्यातून पोलीस दल बळकट करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Talegaon : कुंडमळा येथे रोटरी तर्फे सुरक्षा साहित्याचे वाटप

मी केव्हाही राजकीय हस्तक्षेप केला नाही. माझ्या जवळचा (Chinchwad) असला तरी त्याची गय करू नका. गुन्हेगारांवर मोकासारख्या कारवाया करा, अशा सूचना पोलिसांना दिल्याचे अजित पवार म्हणाले.

पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालयात सध्या अठरा पोलीस स्टेशन आहेत. मागील काही दिवसांपूर्वी सायबर पोलीस ठाण्याला मंजुरी मिळाली आहे. यासह चार नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. हे सर्व प्रस्ताव वित्त विभागाकडे प्रलंबित होते. त्याला मंजुरी मिळाली आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर