एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी (Chinchwad)चिंचवड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 10) रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास चिंचवड येथे करण्यात आली.
आकाश उर्फ कपाळ्या राजू काळे (वय 30, रा. पत्राशेड झोपडपट्टी, लिंक रोड, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल माने यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Alandi : आळंदी काँग्रेसचे कार्यकर्त्यांसह स्थानिकांची अजित पवारांकडे तक्रार
कायदेशीरपणे पिस्तूल बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिंचवड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 42 हजार रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.