Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 7:44 pm

MPC news

PCMC : महापालिका अधिका-यांच्या कामकाजाचे फेरवाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) सामान्य प्रशासन विभागाने कार्यालयीन सोयीनुसार अंतर्गत नियुक्ती, बदल्या केल्या आहेत. त्यानुसार सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्याकडे उद्यान विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली असून प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे यांच्याकडे आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

नवीन नियुक्त झालेले सहाय्यक आयुक्त महेश वाघमोडे यांच्याकडे ह प्रभाग कार्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी या पदावर कामकाज केले आहे.

Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरासाठी चार पोलीस ठाण्यांना मंजुरी; वित्तमंत्री अजित पवार यांची माहिती

प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्याकडे उद्यान विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांच्याकडे यापूर्वी ह क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात (PCMC) आली होती. तसेच क क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे यांच्याकडे क क्षेत्रीय कार्यालयाबरोबरच फ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासन अधिकारी पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे मुख्य अभियंता एक या पदाचा प्रभारी पदभार दिला आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर