एमपीसी न्यूज – नेत्रदान पंधरवड्या निमित्ताने जिल्हा अंधत्व नियंत्रण सोसायटी, मेडिफिट फाऊंडेशनच्या सदस्यांनी सायकल फेरी ( Pimpri ) काढून नेत्रदान करण्याचा संदेश दिला.
या फेरीचे उद्घाटन जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अंजली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. बबन डोळस, डॉ जी.जी खन्ना, डॉ.गणेश भोईर आदी उपस्थित होते. या रॅलीला प्रारंभ पिंपळे सौदागर येथील डॉ अगरवाल आय हॉस्पिटल येथून करण्यात आला. कोकणे चौक- जगताप डेअरी मार्गे-जिल्हा रुग्णालय सांगवी-पिंपळे निलख, वाकड-बाणेर मार्गे पुन्हा पिंपळे सौदागर येथे सांगता करण्यात आली. या रॅलीत 100 हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते.
Talegaon : गांजा बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ.अंजली कुलकर्णी यांनी रॅलीला संबोधित करून नेत्रदानाचे महत्त्व सांगत त्या म्हणाल्या कि, एका व्यक्तीने नेत्रादान केल्यास दोन अंध व्यक्तीचे जीवन प्रकाशमय होते. यासाठी समाजात नेत्रदानाची चळवळ उभी राहिली पाहिजेत. या सायकल रॅलीसाठी पीसीएमसी सायकलिस्ट, पुणे डॉक्टर्स असोसिएशन, स्वरदा, फॅमिली फिजिशयन असोसिएशन (एफपीए) आणि पोरवाल सायकल यांचे विशेष सहकार्य लाभले.
मेडिफिट फाउंडेशनचे सचिव डॉ धनराज हेळंबे यांनी या रॅलीला दिशादर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली. आणि सर्व सायकल स्वरांना संपूर्ण मार्गावर मार्गदर्शन केले. यावेळी सहभागी झालेल्या सायकलस्वारांना नेत्रदान प्रतिज्ञा असलेले प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. अगरवाल आय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ बबन डोळस यांनी सूत्रसंचालन व आभार( Pimpri ) मानले.