Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 6:21 pm

MPC news

Pimpri : कोविड योद्धा महिला बचत गटातील महिलांनी साकारला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा देखावा

एमपीसी न्यूज –  कोविड योद्धा महिला बचत गटाने घरगुती गणेशोत्सवात(Pimpri) मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींचा आकर्षक देखावा साकारला असून हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोरोनामुळे ज्या महिलांच्या पतींचे निधन झाले अशा महिलांना एकत्र करून  महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत उमेद जागर उपक्रमाअंतर्गत कोविड योद्धा महिला बचत गटाची निर्मिती करण्यात आली आहे. थेरगाव येथील या कोविड योद्धा महिला बचत गटातील महिलांनी गणेशोत्सवातील बहिण भावाचा महत्वपूर्ण सोहळा असलेल्या गौरी – गणपती सजावट पूजनाच्या  निमित्ताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या राज्यशासनाच्या महत्वकांक्षी योजनेचा आकर्षक देखावा साकारला आहे.  या देखाव्यात गौरी अर्थात लाडक्या बहिणी या राज्यशासनाच्या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत असल्याचे  चित्र उभे करण्यात आले आहे.  ही संकल्पना आणि प्रत्यक्ष देखावा कोविड योद्धा महिला बचत गटातील सदस्या मीना विष्णू चौधरी आणि सहकाऱ्यांनी साकारला असल्याची माहिती समूह संघटिका वैशाली खरात यांनी दिली आहे.

Alandi : अजित पवार यांच्या हस्ते स्तन, गर्भाशय मुख आणि मुखाच्या कर्करोगासाठी लवकर निदान कार्यक्रमाचे उद्घाटन

कोरोनामुळे ज्या महिलांच्या पतींचे निधन झाले अशा महिलांना एकत्र करून  महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत “उमेद जागर” या  उपक्रमाअंतर्गत कोविड योद्धा महिला बचत गटाची निर्मिती करण्यात आली आहे. या महिलांना महापालिकेमार्फत सिंबायोसिस विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रामार्फत शिवणकलेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत ग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत थेरगाव येथे महिला कोविड योद्धा महिला बचत गटाचे युनिट स्थापन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी महिलांना जागा उपलब्ध करून देण्यासोबतच शिवणयंत्रे व इतर आवश्यक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना उत्पन्नाचे साधन मिळवून देऊन महापालिकेने त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन दिले असल्याची माहिती समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली आहे.

 

 

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर