एमपीसी न्यूज – मी इथला भाई आहे असे म्हणत तिघांनी मिळून (Sangvi) एका तरुणावर खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास पवारनगर, जुनी सांगवी येथे घडली.
ऋषिकेश गोपीचंद गायकवाड (वय 24, रा. जुनी सांगवी) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल भोसले, आयुष घो, आर्यन (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Wakad : पतीने मोबाईल फोन घेऊन न दिल्याने पत्नीची आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे त्यांच्या मित्रासोबत गप्पा मारत थांबले असताना आरोपी तिथे आले. त्यांनी गायकवाड यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या उद्देशाने हत्याराने (Sangvi) त्यांच्यावर वार केला. तो वार चुकवून गायकवाड पळून गेले. त्यावेळी आरोपींनी मी इथला भाई आहे असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.