एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिट तर्फे कुंडमळा (Talegaon)येथे सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. कुंडमळा येथे वारंवार घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे साहित्य वाटप केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक रणजीत जाधव होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिटचे अध्यक्ष रो. महादेव शेंडकर, सचिव रो. सचिन मोरे, प्रकल्प अधिकारी रो. अतुल जोशी, प्रकल्प संयोजक रो. रूपाली तांबे, रो. अनिल नेवाळे, रो. चिंतामणी अभ्यंकर, रो. रवींद्र वसंत भावे, एन स्वाती अभ्यंकर, रो. रंजना शेंडकर या कार्यक्रमात उपस्थित होते.
Alandi : आळंदी नगरपरिषद शाळेच्या नवीन इमारत बांधकामास अधिकचा निधी दिला जाईल – अजित पवार
पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या हस्ते गावकऱ्यांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. सागर भेगडे, गौरव भेगडे, मुन्ना आरसुळे, सौरभ इंगळे, राहुल इंगळे, निकेश इंगळे, संघापल लबडे, अजय राठोड, विशाल देशमुख, प्रसाद पडवळ, विनायकराव भेगडे, बबनराव देशमुख, दत्ता भेगडे, रामहरी भुंडे, आर्य चौधरी यांनी साहित्य स्वीकारले.