पुणे : भारतीय संघाने सलग दुसरा सामना गमावला. भारताला WTC Points Table मध्ये मोठा धक्का बसला आहे. कारण भारताच्या विजयाची टक्केवारी कमी झाली आहे. पण या दोन पराभवानंतरही भारताचा संघ हा WTC Final मध्ये पोहोचू शकतो, असे आता समोर आले आहे. पण भारत या फायनलमध्ये कसा पोहोचू शकतो, याचे समीकरणही आता समोर आले आहे.
भारतीय संघाला पॉइंट्स टेबलमध्ये कोणता धक्का बसला आहे…
भारतीय संघाची पॉइंट्स टेबलमध्ये सामन्यापूर्वी विजयाची टक्केवारी ही ६८.०६ अशी होती. पण पराभवानंतर भारताला या पॉइंट्स टेबलमध्ये मोठा धक्का बसला आहे. कारण पराभवानंतर भारताची पॉइंट्स टेबलमधील विजयाची टक्केवारी ही कमी झालेली आहे. भारताच्या विजयाची टक्केवारी ही या पराभवानंतर आता ६२.८२ एवढी झालेली आहे.
भारत WTC Final मध्ये कसा पोहोचू शकतो, पाहा समीकरण…
भारताचे अजून सहा सामने शिल्लक आहेत. भारताचा न्यूझीलंडबरोबर एक सामना आहे, तर ऑस्ट्रेलियाबरोबर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघ सध्याच्या घडीला अव्वल स्थानावर आहे. फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर भारताला अव्वल दोन संघांत कायम राहावे लागेल. त्यामुळे भारताने यापुढील चार सामन्यांत जर विजय मिळवला तर त्यांना फायनलमध्ये पोहोचता येऊ शकते. त्यामुले भारताला आता सहा पैकी चार तरी सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे भारतासाठी न्यूझीलंडविरुद्धचा अखेरचा सामना महत्वाचा असेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील पाच कसोटी सामन्यांची मालिका भारतासाठी निर्णायक ठरणार आहे.
न्यूझीलंडचा संघ कितव्या स्थानावर आहे, पाहा…
न्यूझीलंडने भारताला दोन्ही कसोटी सामन्यांत पराभूत केले. त्यामुळे पॉइंट्स टेबलमध्ये आता त्यांनी चांगलीच झेप घेतली आहे. न्यूझीलंडच्या संघाची विजयाची टक्केवारी ही ५०.०० एवढी आहे. त्याचबरोबर या दोन विजयांसह न्यूझीलंडच्या संघाने चौथे स्थान यावेळी पटकावलेले आहे.
माझं मराठी एवढं चांगलं नाही ते पुढचा गिल, जैस्वाल, बुमराह तुमच्यापैकीच; रोहित शर्माचं मराठीत भाषण
भारतीय संघ दोन पराभवानंतरही अजून अव्वल स्थानावर विराजमान आहे. पण भारतासाठी आगामी सहा सामने सोपे नसणार आहेत. त्यामुळे भारतीय संघ या सहापैकी किती सामन्यांत विजय मिळवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
स्रोत : महाराष्ट्र टाईम्स