Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 7:07 am

MPC news

रावेर मतदारसंघात काँग्रेसमध्ये धुसफूस; धनंजय चौधरींच्या उमेदवारीला विरोध, लोकनियुक्त नेत्याच्या हाती बंडाचा झेंडा

निलेश पाटील, जळगाव : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून टप्प्यटप्प्याने उमेदवार यादी जाहीर केली जात असून प्रत्येक मतदारसंघात आता राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरली असून पक्षातच बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. यात काँग्रेस पक्षाचे नेते देखील मागे राहिलेले नाहीत. रावेर विधानसभेतही असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. आमदार शिरीष चौधरी यांच्या पुत्राला उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले असून त्यांनी बंडखोरी करण्याचे ठाणले आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी रावेर विधानसभेतून तिकीट मिळावे अशी काँग्रेस पक्षाकडे मागणी केली होती. मात्र बाळासाहेब थोरात यांनी खिरोदा येथील कृतज्ञता सोहळ्यामध्ये आमदार चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांनाच उमेदवारी जाहीर केली होती. काँग्रेसची राज्यातील पहिलीच उमेदवारी चौधरींना जाहीर करण्यात आली होती. मात्र यानंतर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होऊन इच्छुक उमेदवारांनी घराणेशाहीवर नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचा मोहरा! सोलापुरातील राजकारणात नवी रंगत, काका पुतण्या दोघेही रिंगणात
रावेर विधानसभेतून दारा मोहम्मद यांनी निवडणुकीसाठी तयारी सुरु केली होती. मात्र पक्षाकडून त्यांना डावलले गेल्याने त्यांनी रावेर विधानसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे रावेर विधानसभेत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांच्यासमोर दारा मोहम्मद यांचे मोठे आव्हान असणार आहे.

दारा मोहम्मद म्हणतात…
मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र त्यांनी मला डावलून कोणताही राजकीय अनुभव नसलेल्या धनंजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली. एकप्रकारे चौधरी परिवाराने घराणेशाही चालवली आहे. माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांच्यानंतर आमदार शिरीष चौधरी आणि आता धनंजय चौधरी असा वारसा चालवलेला आहे. त्यामुळे निष्ठावान काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजी आणि यांचे झेंडे पकडायचे का? असा संतप्त सवाल मोहम्मद यांनी उपस्थित केला.

‘धनंजय चौधरी हा नवखा उमेदवार आहे. त्याच्याजवळ कोणताही राजकीय अनुभव नसून त्याने आजपर्यंत ग्रामपंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद अशी कोणतीही निवडणूक लढलेली नाही. आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर यावल तालुक्यात गेल्या पाच वर्षात कोणतीही विकास कामे केलेली नाही. असे असल्याने मी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली असून मुस्लिम समाज व प्रत्येक घटकाचा मी उमेदवार असणार आहे. माजी उमेदवारी मी कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही. चौधरी परिवाराला त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा पवित्राच दारा मोहम्मद यांनी घेतला आहे.

स्रोत : महाराष्ट्र टाईम्स

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर