पुणे : विराट कोहलीचं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. कारण मैदानात त्याची बॅट चालत नाही. पण मैदानाबाहेर मात्र तो चाहत्यावर चांगलाच भडकला होता. विराट कोहलीने आपली बॅटही आपटली. त्यानंतर नेमकं घडलं तरी काय, याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.
विराट कोहलीची बॅट ही सध्या चांगलीच थंड पडलेली दिसत आहे. कारण दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावांत तो अपयशी ठरला. बऱ्याच महिन्यांपासून त्याला शतकही झळकावता आलेले नाही. त्यामुळे विराट कोहली दडपणाखाली आहे. पण दुसऱ्या सामन्यात जेव्हा तो बाद झाला तेव्हा मैदानातील चाहत्यावर तो चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
विराट कोहली शनिवारी दुसऱ्या डावात पायचीत झाला. यावेळी पंचांना निर्णय विराटला पटला नाही. कारण रिप्लेमध्ये पंचांचा निर्णय किती चुकीचा आहे, हे पाहायला मिळत होते. पण विराट पंचांवर राग काढू शकत नव्हता. पण हा राग त्याचा चाहत्यावर निघाला. विराट कोहली बाद झाला आणि तो पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला. विराट यावेळी निराश झाला होता. त्यामध्येच एका चाहत्याने ‘हार्ड लक, हार्ड लक…’ अशी कमेंट केली. विराट कोहवी यानंतर चांगलाच भडकला. विराटने त्यानंतर आपली बॅट तिथे असलेल्या बॉक्सवर आपटली. त्यानंतर विराट पुढे आला आणि आपली बॅट पाहून मान झुकवून चालत गेला. विराटचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. विराट यावेळी चाहत्यावर चांगलाच भडकला होता. हा राग त्याने बॅट आपटत काढल्याचे सर्वांनी पाहिले.
विराट कोहलीने मांसाहार का सोडला ? काय आहे विराटचा फिटनेस राज
विराट हा सध्याच्या घडीला धावांचा दुष्काळ अनुभवत आहे. कारण टी २० वर्ल्ड कपपासून विराट कोहलीची एकही खेळी कोणाच्याही लक्षात राहीलेली नाही. त्यामुळे विराट कोहलीवर टीका होता आहे. विरा फक्त पुण्याईच्या जोरावरच संघात स्थान टिकवून आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता विराट कोहली पुढच्या कसोटीत कशी कामगिरी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
स्रोत : महाराष्ट्र टाईम्स