पुणे : टीम इंडिया आणि न्यूझीलंडमधील दुसऱ्या कसोटी सामन्यातही किंवींना विजय मिळवला. दुसरा कसोटी सामना पुण्यातील गहुंजे येथील स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने ११४ धावांनी टीम इंडियावर वियजय मिळवला. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये सलग दोन सामने जिंकत न्यूझीलंडने मालिका खिशात घातली आहे. विशेष म्हणजे भारतीय भूमीवर तब्बल १२ वर्षांनी टीम इंडियाविरूद्ध विरोधी संघाने कसोटी मालिक जिंकली आहे. याआधी १२ वर्षांआधी म्हणजे इंग्लंडने २०१२ ला टीम इंडियाला पराभूत करत मालिका जिंकलेली. टीम इंडियाच्या पराभवानंतर सचिन तेंडुलकर याने पोस्ट केली असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सचिन तेंडुलकर काय म्हणाला
कोणत्याही संघासाठी भारतामध्ये येऊन कसोटी मालिका जिंकणे स्वप्नासारखं आहे. न्यूझीलंड संघाने खरोखर दमदार कामगिरी केलीय. सांघिक प्रयत्नानंतर तुम्हाला असे विजय मिळवता येतात. खास करून मिचेल सँटरन याचं नाव घेऊ इच्छितो त्याने १३ विकेट घेत उत्कृष्ट कामगिरी केली. या विशेष कामगिरीबद्दल न्यूझीलंड संघाचे अभिनंदन, असं म्हणत सचिन तेंडुलकर याने न्यूझीलंड संघाचे कौतुक केले.
न्यूझीलंड संघाचा गोलंदाज मिचेल सँटनर याने दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये १३ विकेट घेतल्या. टीम इंडियाला खऱ्या अर्थाने त्याने बॅकफूटवर ढकललं. पहिल्या डावात सँटनरने सात आणि दुसऱ्या डावामध्ये त्याने सहा विकेट घेतल्या. तसं पाहायला गेला तर टीम इंडियाच नाहीतर न्यूझीलंडलाही कल्पनाही नव्हती की सँटनर टीम इंडियासाठी खलनायक ठरेल. मात्र सँटनरने आपल्या शानदार कामगिरीने विजयाच महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं आहे.
सामन्याचा धावता आढावान्यूझाीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २५९ धावा केल्या होत्या. वॉशिंग्टन सुंदर याने सात विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाला १५६ धावांवर ऑल आऊट झाली. आघाडी घेतलेल्या न्यूझीलंड संघाने दुसऱ्या डावामध्ये २५५ धावा करत टीम इंडियाला ३५९ धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला दुसऱ्या डावामध्ये किवींनी २४५ धावांवर ऑल आऊट करत ११४ धावांनी विजय मिळवला.
स्रोत: महाराष्ट्र टाइम्स