Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 7:54 am

MPC news

MS Dhoni ने अखेर होकार दिला, IPL 2025 पूर्वी निवडणूकीत पाहायला मिळणार धोनीची जादू

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी हा पुढच्या आयपीएलमध्ये खेळणार की नाही, हे अद्याप समजलेले नाही. पण आयपीएलपूर्वी धोनी हा निवडणूकीत दिसणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत धोनीची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

आयपीएलमधील CSK चा संघ हा धोनीला संघात घेण्यासाठी उत्सुक आहे. पण महेंद्रसिंग धोनीने मात्र अजून आपण खेळणार की नाही, हे अजूनही संघाला कळवलेले नाही. पण निवडणूकासाठी मात्र त्याने होकार दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आयपीएलपूर्वी धोनी आता निवडणूकीत पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावेळी आयपीएलमध्ये मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे नामांकित खेळाडू जर लिलावात दाखल झाले तर त्यांना मोठी किंमत मिळू शकते, असे समोर येत आहे. पण धोनी मात्र चेन्नईच्या संघाला कुठेही सोडून जाणार नाही, हे निश्चत आहे. पण दुसरीकडे धोनी हा आयपीएलमध्ये पुढच्या हंगामात खेळणार की नाही, हे अजून ठरलेले नाही. कारण धोनीनेच चेन्नई सुपर किंग्स संघाच्या प्रस्तावावर अजून होकार दिलेला नाही. धोनी जेव्हा होकार देईल, त्यानंतरच त्याला संघात स्थान दिले आहे याची अधिकृत घोषणा केली जाईल. पण धोनीने मात्र अजून आयपीएलमध्ये खेळणार की नाही, हे स्पष्ट केलेले नाही. पण दुसरीकडे निवडणूकीसाठी मात्र त्याने आता होकार दिला आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी रवी कुमार यांनी याबाबतची माहिती दिली. रवी कुमार म्हणाले की, ” महेंद्रसिंग धोनी हा झारखंडमधील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. झारखंडमधील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी धोनी आमची मदत करणार आहे आणि त्याने यासाठी सहमती दिली आहे. या सर्व कार्यक्रमासाठी आम्ही धोनीच्या फोटो आणि व्हिडिओचा वापर करणार आहोत आणि यासाठी धोनीने आम्हाला होकारही दिला आहे. त्यामुळे झारखंडमधील मतदानापूर्वी धोनी हा येथील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. ” त्यामुळे धोनीची जादू आता झारखंडच्या निवडणूकीत पाहायला मिळेल, असे आता म्हटले जात आहे. कारण धोनीमुळे झारखंडमधील मतदानाचा टक्का वाढू शकतो, असे आता म्हटले जात आहे.

एमएस धोनी मुंबई विमानतळावर कुटुंबासह स्पॉट
धोनीने काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते आणि मंत्री अमित शहा यांची भेट झाली होती. त्यावेळी धोनी हा भाजपामध्ये प्रवेश करणार, अशा अफवा पसरल्या होत्या. पण धोनीने कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. धोनीने आपण निवडणूकीला उभे राहणार असल्याचेही कधी म्हटले नाही. त्यामुळे धोनीचा सध्या तरी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा विचार नाही. त्यामुळे या निवडणूकीत तरी धोनी कोणत्याही पक्षाकडून उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्रोत : महाराष्ट्र टाईम्स

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर