डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती 4 फळे खाऊ नयेत, तज्ज्ञाचं काय मत ?
मधुमेह किंवा डायबिटीज रुग्णांचा आहार संतुलित असावा लागतो.फळात सी विटामिन्स आणि फायबर असल्याने फळे चांगली असली तर काही फळांना डायबिटीज पेशंट खाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांची रक्तातील साखर वाढू शकते.
डायबिटीजला मधुमेह देखील म्हटले जाते. या आजारात रक्तातील शुगर पातळी नियंत्रित ठेवावी लागत असते. या आजारात शुगर नियंत्रणाबाहेर गेली तर अन्य आजार होतात. डायबिटीज टाइप – 1 आणि टाइप – 2 अशा दोन प्रकारचा असतो. या आजाराच्या लक्षणात वारंवार तहान लागणे, वारंवार लघवीला जाणे, आणि थकवा तसचे धुरकट दिसू लागणे अशा प्रकारची लक्षणं दिस असतात. नमामी अग्रवाल यांच्या मते डायबिटीज आजारात आहारावर लक्ष ठेवावे लागत असते. या आजारावर उपचार नाहीत म्हणजे केवळ आहार आणि व्यायामाच्या मदतीने यावर उपचार करता येतो. डॉक्टरकडून सल्ला घेऊन आहारात फळांचा समावेश करावा लागतो. साखर जादा असणारी फळे शक्यतो खाऊच नयेत. कोणते फळे खाऊ नयेत याची माहिती पाहूयात
केळ –
केळात कार्बोहाइड्रेट आणि शर्करा जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे केळी अजिबात खाऊ नयेत हवा तर तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता
द्राक्षे –
द्राक्षात देखील नैसर्गिक रित्या साखरेचे प्रमाण जादा असते. त्याचा ग्लाइसेमिक इंडेक्स देखील जास्त असतो. त्यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. त्यामुळे मधुमेहींनी द्राक्षं खावू नयेत
कलिंगड –
कलिंगडात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने कलिंगड कमी खावे, शुगर असलेल्यांनी कलिंगड खाऊच नयेत अन्यथा साखरेचे प्रमाण वाढू शकते.
ड्राय फ्रूट्स
मणूके, खजूर, अंजीर या ड्रायफ्रुट्स मध्ये साखर जास्त प्रमाणाक असते. त्यामुळे डायबिटीसवाल्यानी सुकामेवा खाऊ नये. चिकू, सीताफळं आणि आंबे ही फळं अधिक साखर असलेली असतात. त्यामुळे ती खाऊच नयेत आपल्या डॉक्टरांना विचारुनच आपला आहार निश्चित करावा.तसेच संतुलित आहार आणि व्यायाम योग्य जीवनशैलीचे पालन केल्याने डायबिटीज नियंत्रित राहतो.
स्रोत: टी वी9 मराठी