Explore

Search
Close this search box.

Search

November 8, 2024 12:16 am

MPC news

वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून

Methi Sprouts Benefits: आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेली मोड आलेली मेथी आहारात प्रमुख स्थानी आहे. जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ञ सुषमा पीएस यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. मोड आलेली मेथी हे आवश्यक जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सच्या केंद्रस्थानी आहेत. तसेच हे व्हिटॅमिन-सी, ए ने समृद्ध असून जे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

सुषमा यांच्या सांगण्यानुसार, मोड आलेल्या मेथीचे आरोग्यदायी फायदे

पचनासाठी फायदेशीर

मोड आलेल्या मेथीमधील उच्च फायबर सामग्री पचनास मदत करून आणि कफ रोखून निरोगी पचन तंत्राला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

रक्तातील साखरेचे व्यवस्थापन

मोड आलेली मेथी रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. हे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहे.

संरक्षण

मोड आलेली मेथी अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी कंपाऊंडने परिपूर्ण असतात, जे संपूर्ण शरीरातील सूज कमी करण्यास फायदेशीर आणि विविध आरोग्य समस्या कमी करण्यासाठी योगदान ठरू शकते.

हृदय-निरोगी आणि वजन नियंत्रणात ठेवते

अंकुरीत मेथी कोलेस्ट्रॉलची क्षमता कमी करण्यास फायदेशीर ठरू शकते, जे हृदयविकारापासून बचाव करतात. तसेच कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे मोड आलेली मेथी परिपूर्णतेची भावना वाढवू शकते.

रोगप्रतिकारशक्ती आणि हाडांसाठी फायदेशीर

मोड आलेली मेथी शरीरात संरचना असलेले व्हिटॅमिन-सी तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, मोड आलेल्या मेथीमध्ये फायटोएस्ट्रोजन गुण असतात, जे हार्मोनल समतोल राखतात. मोड आलेली मेथी हे कॅल्शियम आणि इतर खनिजांचे साधन आहेत, जे मजबूत हाडांसाठी फायदेशीर आहे.

मोड आलेली मेथी खाण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी

मोड आलेली मेथी खाण्याचे अनेक फायदे असले तरी मोड आलेली मेथी प्रत्येकासाठी फायदेशीर असू शकत नाही.

आहारातील कोणताही बदल करण्यापूर्वी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

गर्भवती महिलांनी तसेच ॲलर्जी असणाऱ्या व्यक्तींनीही मोड आलेल्या मेथीचे सेवन करण्यापूर्वी काळजी घ्यावी.

याच्या अतिसेवनाने पोट फुगणे आणि गॅसची समस्या उद्भवू शकते.

स्रोत : लोकसत्ता

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर