Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 6:27 pm

MPC news

IND vs NZ : “आम्ही चांगली….”, हरमनप्रीतने पराभवानंतर बोलूनच दाखवलं

IND vs NZ : “आम्ही चांगली….”, हरमनप्रीतने पराभवानंतर बोलूनच दाखवलं

India vs New Zealand Womens 2nd Odi Post Match : न्यूझीलंडने वूमन्सने टीम इंडियावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 76 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.

मेन्सनंतर आता वूमन्स न्यूझीलंडनेही टीम इंडियाचा पराभव केला आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाला पुण्यात दुसऱ्या कसोटीच्या तिसर्‍याच दिवशी पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने यासह 12 वर्षांनंतर मायदेशात मालिका गमावली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वातील टीम इंडियाला पराभवाची धुळ चारली. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 260 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय फंलदाजांनी न्यूझीलंडसमोर गुडघे टेकले. न्यूझीलंडने टीम इंडियाला 47.1 ओव्हरमध्ये 183 धावांवर गुंडाळलं आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. टीम इंडियाला हा सामना जिंकून आधीच मालिका जिंकण्याची संधी होती, मात्र न्यूझीलंडने तसं होऊ दिलं नाही.

राधा यादव आणि सायमा ठाकोर या जोडीचा अपवाद वगळता टीम इंडियाकडून एकालाही टिकून खेळता आलं नाही. टीम इंडियासाठी या दोघींनी नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. मात्र ही भागादारी विजयासाठी पुरेशी ठरली नाही. सायमा ठाकोर हीने 29 आणि राधा यादव हीने 48 धावांची खेळी केली. टीम इंडियाच्या या पराभवानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने नक्की काय आणि कुठे चुकलं? हे सांगितलंय

हरमनप्रीत कौर काय म्हणाली?
“आम्ही खूप धावा दिल्या, तसेच अनेक कॅच सोडल्या. हे आव्हान पूर्ण करण्यासारखं होतं. मात्र आम्ही चांगली बॅटिंग केली नाही. राधा आणि सायमाची बॅट चांगली आहे, हे पाहून आनंद झाला. आम्ही ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. आम्ही पुढील सामन्यात भागीदारी करण्याचा प्रयत्न करु. बॅटिंगकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. बॅटिंगकडे लक्ष देत अपेक्षित कामगिरी केली तर मालिका जिंकू शकतो”, असं हरमनप्रीत कौरने सामन्यानंतर म्हटलं.

स्रोत: टी वी9 मराठी

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर