IDFC First Bank Share Price : सप्टेंबर तिमाहीच्या नफ्यात घट झाल्याचा फटका आयडीएफसी फर्स्ट बँकेला आज बसला. शेअरनं आज ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला.
Share Market updates : आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर सोमवारी व्यवहारात १० टक्क्यांनी घसरून ५९.२४ रुपयांवर पोहोचला. ही त्याची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत देखील होती. मात्र, नंतर थोडीशी खरेदी झाली आणि शेअरने इंट्राडे उच्चांकी स्तर ६५.१९ रुपयांवर पोहोचला. सप्टेंबर तिमाहीतील खराब निकालांमुळे बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत बँकेच्या नफ्यात ७३ टक्क्यांनी घट झाली आहे. नफ्यात मोठी घसरण झाल्यानंतर जागतिक ब्रोकरेज कंपन्यांनाही धक्का बसला आणि त्यांनी आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअरच्या किमतीचे लक्ष्य कमी केले.
ब्रोकरेज फर्म नुवामाने दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर शेअरवर ‘होल्ड’ रेटिंग कायम ठेवले आहे. मात्र, टार्गेट प्राइस ७२ रुपयांवरून ६० रुपये करण्यात आली आहे. गेल्या अनेक ट्रेडिंग दिवसांपासून हा शेअर मंदावलेला आहे. गेल्या पाच दिवसांत त्यात ८ टक्के, एका महिन्यात १३ टक्के आणि सहा महिन्यांत २० टक्क्यांनी घसरण झाली आहे. या वर्षी आतापर्यंत हा शेअर २६ टक्क्यांनी घसरला आहे. वर्षभरात हा शेअर २१ टक्क्यांनी घसरला आहे.
स्रोत: हिंदुस्थान टाइम्स