Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 6:26 am

MPC news

‘या’ आठवड्यात तीन दिवस बंद राहणार बँका; कोणत्या दिवशी असेल दिवाळीची सुट्टी?

Diwali Bank Holidays : आजपासून सुरू होणार आठवडा दिवाळीचा असल्यामुळं सुट्ट्यांविषयी लोकांना उत्सुकता आहे.

Bank Holidays on Diwali : ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा आजपासून सुरू होतोय. आजपासूनच दिवाळीचा उत्सव देखील सुरू होत आहे. यंदा दिवाळीच्या मुहूर्ताबाबत संभ्रम आहे. काही लोक ३१ ऑक्टोबर (गुरुवार) रोजी तर, बरेच लोक १ नोव्हेंबर २०२४ (शुक्रवार) रोजी दिवाळी साजरी करत आहेत. त्यामुळं बँकांच्या सुट्यांबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

दिवाळीच्या आठवड्यात काही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर बँकांच्या सुट्टीबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. पाहूया या आठवड्यात बँका नेमक्या कधी बंद राहणार आहेत.

दिवाळी कधी?

यंदाच्या दिवाळीबाबत मोठा गोंधळ आहे. कॅलेंडरनुसार ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी दिवाळी आहे. या दिवशी अमावस्या दुपारी ३.५२ वाजता सुरू होईल आणि १ नोव्हेंबरला संध्याकाळी ६.१६ वाजता संपेल. अमावस्या १ नोव्हेंबरला संपणार आहे, त्यामुळं या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याची शक्यता नाही. त्यामुळंच बहुतेक लोक ३१ ऑक्टोबरला दिवाळी साजरी करण्याची शक्यता आहे.

या आठवड्यात बँका कधी बंद राहणार?

रिझर्व्ह बँकेनं (RBI) जाहीर केलेल्या केलेल्या बँक हॉलिडे लिस्टनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी दिवाळीनिमित्त अहमदाबाद, अगेवाल, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, इटानगर, कानपूर, जयपूर, कोची, कोहिमा, लखनौ, कोलकाता, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिमला आणि तिरुअनंतपुरमच्या बँका बंद राहतील.

१ नोव्हेंबर २०२४ रोजी दिवाळी अमावस्येमुळं मुंबई, नागपूर, आगरतळा, बेलापूर, बंगळुरू, डेहराडून, गंगटोक, इम्फाळ, जम्मू, शिलाँग, श्रीनगर इथं बँकेला सुट्टी आहे.

मुंबई, नागपूर, अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनौ येथील बँकांना २ नोव्हेंबर रोजी दिवाळी किंवा बली प्रतिपदेनिमित्त सुट्टी आहे.

३ नोव्हेंबरला भाऊबीज आणि रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

ही सेवा सुरू राहणार

बँकांना सुट्टी असली तरी या दिवशी एटीएम सेवा सुरळीत सुरू राहील. याशिवाय नेट बँकिंग आणि ऑनलाइन बँकिंगची सुविधाही उपलब्ध आहे.

बँकेच्या सुट्ट्या कोण ठरवतात?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) बँकेच्या सुट्ट्यांचा निर्णय घेते. वास्तविक, बँकेची साप्ताहिक सुट्टी रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी असते. याशिवाय प्रादेशिक सणांमुळं देखील बँका बंद असतात. RBI दर महिन्याला बँकांच्या सुट्टीची यादी प्रसिद्ध करते.

स्रोत: हिंदुस्थान टाइम्स

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर